" डोंगरातून जाणारी वळणा- वळणाची वाट, त्या रस्त्याच्या दुतर्फा असणारी हिरवीगार वनराई..
आणि अश्या एखाद्या वळणावर , त्या हिरवाईत दिसणारा " लाल-डब्बा"...🚌🚃
" लाल - डब्बा " या नावाने प्रसिद्ध असणारी आपली सर्वांची लाडकी S.T. ..🚌
" फाट्यावर सगळ्यांना वाट बघायला लावणारी ,
उशिरा निघून, वेळेला पोहचवनारी..." 😜
"प्रवाशांच्या सेवेसाठी" हे ब्रीद वाक्य घेऊन धावणारी आपली S.T...दैनंदिन जीवनात खरच प्रवाश्यांच्या विश्वासाला सार्थ ठरतेय...
" रस्ता कसाही असो हो...पण आपला मिजास आणि थाट तेवढ्याच डौलात घेऊन धावणारी..
"जिथे रस्ता, तिथे S.T " या वाक्याप्रमाणेच छोटी छोटी गावं जोडणारी वाहिनी...."
" गावाकडच्या कॉलेज जीवनात महत्वाची भूमिका बजावणारी.. काहींची मनं येथेच जुळली..आणि काहींचा " फॅन्ड्री " पण येथेच झाला..."😜😝
" कमी पैशात, गावाकडील ज्येष्ठ व्यक्तींना (बहुतांशी म्हातारी माणसं ) आपल्या मुलींना - नातवंडांना भेटण्याची सुवर्णसंधी मिळवून देणारं ग्रामीण भागातील " विमानच " म्हणा ना..." ✈🚁
"फिरस्ती" लोकांना आवडेल तिथं प्रवास हि सुविधा उपलब्ध करून देणारी..." 👬👬
" एकेकाळी टपावर मोठ-मोठ्या बॅगा मिरवत धावणारी एसटी आता अभावानेच दिसते. तशी कारनं पण बरेच आहेत म्हणा....सध्या एसटी अस्वच्छतेच्या विळख्यात बुडालेली आहे अस म्हणण्यात वावगं ठरणार नाही म्हणा...असो..."
स्वातंत्र्योत्तर काळात, तत्कालीन मुंबई प्रांतात ‘बॉम्बे स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट कॉपरेरेशन’ (बीएसआरटीसी) ही सार्वजनिक कंपनी सुरू झाली होती. त्या कंपनीची पहिली बस १ जून १९४९ या दिवशी मुंबई ते अहमदाबाद (तेव्हा मुंबई प्रांतातच) या मार्गावर धावली होती. त्यामुळे, हा दिवस एस.टी.चा वर्धापन दिन म्हणून साजरा होतो. ( संदर्भ- लोकसत्ता)
अश्या या आपल्या लाडक्या एसटी चा काल ६८ वा वर्धापन दिन होता...कालच गावाकडं जाण्याचा योग आला म्हणून ते पण माहित झालं...कितीही महागड्या गाड्यातून प्रवास केला तरी आपल्या लाडक्या एसटी ची त्याला सर यायची नाय म्हणा.. "स्वत्याच्या विश्वात Music Composer असणार्या आपल्या लाडक्या एसटी चा #Birthday...
काल एक सुंदर चारोळी वाचण्यात आली...
" एकदा व्होल्वो बस म्हणाली, तोऱ्यात लाल एस. टी. ला बाजूला हो भिकार्डे दिसत नाही का तुला...
लाल एस.टी. डोळे मिचकावत म्हणाली..
एकदा ये तर खरी मुक्काम पोस्ट चिखल वाडीला..
मग बघू पेलवते का तुझ्या फॉरेन बॉडीला..."
#लाल_डब्बा
#प्रवाशांच्या_सेवेसाठी_सैदव_तत्पर
#प्रवाश्यांच्या_सेवेसाठी
#६८_वा_वर्धापन_दिन 🎂🎊💐
#latepost
#१_जून
© Somnath R. Mohite

No comments:
Post a Comment